…म्हणूनच आम.नितेश राणे यांच्याकडून शिवसेनेची बदनामी

विरोधी गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांचा टोला

*⚡कणकवली दि.१२-:* आमदार नितेश राणे हे शिवसेनेत संभ्रम निर्माण करण्यासाठी वक्तव्य करत आहेत मात्र याचा परिणाम शिवसेनेवर होणार नाही. शिवसेना ही एकसंघ असून जिल्हा बँक निवडणूक ही सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी लढणार असून आम.नितेश राणे यांच्या पायाखालची वाळू सरकल्या मुळेच ते शिवसेनेची बदनामी करीत असल्याची टीका कणकवली नगरपंचायत विरोधी गटनेते नगरसेवक सुशांत नाईक यांनी केली. कणकवली येथे बोलताना सुशांत नाईक म्हणाले, खंडणीबाबत आम. नितेश राणे यांनी बोलणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार असल्याचे सांगताना सुशांत नाईक म्हणाले, ईडीची चौकशी लावण्याची धमकी आम.नितेश राणे देत आहेत मात्र ज्यांच्या मागे ईडीच्या चौकशा लागल्या असेच लोक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ईडीचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असल्याचा टोला सुशांत नाईक यांनी लगावला.त्यामुळे शिवसेनेवर बोलताना स्वतःचा इतिहास तपासा असे सुशांत नाईक म्हणाले.

You cannot copy content of this page