नांदगाव परीसरातील विज बिलअभावी विज खंडित करु नये;

शिवसेनेची मागणी

*⚡कणकवली दि.१२-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव परीसरातील विज बिल अभावी विज पुरवठा खंडित करण्यात येवू नये तसेच विज बिल हप्त्यात घेणेत यावे अशी मागणी नांदगाव शिवसेना शाखा प्रमुख राजा म्हसकर व शिवसेना पदाधिकारी यांनी विद्युत अभियंता विज वितरण कंपनी नांदगाव यांच्याकडे केली आहे. सध्या कोरोना पाश्र्वभूमीवर सामान्य नागरिक पूर्ण मेटाकुटीला आला आहे . तेव्हा आपण विज बिल हप्त्यात घेणेत यावे गणेशोत्सव जवळ येत आहे .या काळात कोणाचाही विज पुरवठा बंद करू नये अशी विनंती या निवेदनातून केली आहे. यावेळी नांदगाव शाखा प्रमुख राजा म्हसकर, सोसायटी चेअरमन रविंद्र तेली, प्रफुल्ल तोरसकर,बबन बांदिवडेकर,समिर कुंभार,बाळा सातोसे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page