नितेश राणे तुम्ही तुमचे घर सांभाळा, शिवसेनेच्या भानगडीत पडू नका

शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा सल्ला;ही तर दिल्ली भाजपा आशीर्वाद यात्रा

*⚡कणकवली दि.१२-:* दोन वेळा निवडणूक गेलेल्या आमदाराची पूरस्थितीवर बोलण्याची मानसिकता नाही.मात्र शिवसेनेवर बोलण्यास वेळ देतो ,ज्या राणे परिवाराने २०१७ साली स्वाभिमान पक्ष काढला आणि २०१९ ला स्वाभिमान भाजपात विसर्जीत केला.सत्तेसाठी स्वतःच्या वडिलांना दिल्लीश्ववरांचे पाय धरावे लागले. आर्थिक तडजोडी करत राज्यसभा मिळविली.त्यामुळे नितेश राणे तुम्ही शिवसेनेची काळजी करु नका,ज्या उद्धव ठाकरेंनी राणेंना पाणी चारले.त्यांचे शिवसैनिक तुम्हाला पुरून उरतील असा इशारा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी आम.नितेश राणे यांच्यावर टीका करताना केली.परमवीर सिंग यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस काढण्यात आली आहे त्यामुळे नितेश राणे तुम्ही तुमचे घर सांभाळा शिवसेनेच्या भानगडीत पडू नका असा सल्ला अतुल रावराणे यांनी दिला. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत,महिला आघाडी प्रमुख नीलम पालव-सावंत,नगरसेवक सुशांत नाईक,राजू राठोड,नगरसेवक कन्हैया पारकर,भास्कर राणे,रिमेश चव्हाण,सुनील पारकर,रामदास विखाळे,पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत,महेंद्र डिचोलकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. अतुल रावराणे म्हणाले,स्वाभिमान पक्ष दोन वर्षात विसर्जित केला,ज्या शिवसेनेने वडिलांना दोन वेळा पाडले, एकदा भावाला पाडले,त्यांनी शिवसेनेवर काय बोलावे.पुढील काळात तिसऱ्यांदा विनायक राऊत बहुमतांनी निवडुन येतील.जे नितेश राणे हे नाम.उदय सामंत यांना दरदिवशी दोन वेळा फोन करतात,किरण सामंत यांना तुमची माणसे भेटतात.मग त्यांच्या टीका करत जनतेची दिशाभूल कशासाठी?मुबंईतील राजेंद्र कदम प्रकरण लोकांना माहीत आहे,परमवीर सिंग यांचे हाल काय आहेत,हे नितेश राणेंनी लक्षात ठेवावे,असा इशारा देतानाच जन आशीर्वाद यात्रा नव्हे तर ही दिल्ली भाजपा आशीर्वाद यात्रा आहे.तुमच्या परिवाराचे अवगुण संपुर्ण जिल्ह्याला माहीत आहेत.नितेश राणे तुमची वक्तव्य थांबवा,नाहीतर शिवसैनिक तुम्हाला जागा दाखवतील,असा इशारा शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी दिला आहे. ठाकरे सरकार अतिशय चांगल्या प्रकारे राज्य चालवत आहेत.खा.विनायक राऊत हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आहेत.शिवसेनेत कुणाला कुठल्या पदावर बसवायचे हा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे घेतात.पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगले काम केले आहे,त्याची बदनामी करु नये.मागील राऊत यांच्या निवडणुकीत तुम्ही भावाला पाडवण्यासाठी मदत केली होती का?असा सवाल अतुल रावराणे यांनी केला. नितेश राणे तुमची कुंडली काढली तर काय होईल?राजेंद्र कदम विषयात काय केलात हे माहीत आहे.केलेलं पाप कमी होणार आहे.दिल्ली वारी केली तरी वजन टाकावं लागत.ज्या सामंत बंधूंचा क्रशर कोणी फोडला हे जनतेला माहीत आहे.जनतेचे भलं करण्यासाठी काम करा.शिवसेनेत चांगल वातावरण आहे,नितेश राणे यांनी लक्षात ठेवावे,नाक खुपसू नका.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे.विनायक राऊत सच्चे शिवसैनिक आहेत,ना.उदय सामंत रत्नागिरीतुन निवडुन आले आहे.ज्यांना दोन वर्षे आपला पक्ष चालवता येत नाही. त्यांनी शिवसैनिकांमध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये, तुमचा खोटारडेपणा संपूर्ण जनता आणि शिवसैनिकांना माहित असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. जन आशीर्वाद यात्रा नाही तर दिल्ली भाजपा आशीर्वाद यात्रा आहे.कोरोनाचा नियम पाळून यात्रा काढावी.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना चांगल्या प्रकारे हाताळला आहे. त्यामुळे कोकणात यात्रा आणताना कोरोना वाढणार नाही याची काळजी घ्यावी असा टोलाही अतुल रावराणे यांनी लगावला आहे.

You cannot copy content of this page