*⚡वेंगुर्ला ता.१२-:* नागपंचमीच्या सणानिमित्त वेंगुर्ला बाजारपेठेत नागाच्या मूर्त्या विक्रीस आल्या होत्या. नागरीकांनी सकाळपासूनच हजेरी लावत या मूर्त्या खरेदी केल्या. श्रावण महिना हा व्रतवैकल्य, सण आणि उत्सव यासाठी प्रसिद्ध आहे. या महिन्यातील नागपंचमी हा सण आज घरोघरी साजरा होणार आहे. या सणासाठी लागणा-या नागाच्या मूर्त्या बुधवारपासूनच बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या होत्या. तसेच गणपतीच्या शाळांमध्येही मागणीनुसार नागांच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या होत्या. या सणासाठी लागणा-या नागमूर्त्यांबरोबरच लाहे, हळदीची पाने तसेच इतर साहित्य विक्रीसाठी आले होते. नागरिकांनी याची दुपारपर्यंत खरेदी केली.
नागपंचमीनिमित्त वेंगुर्ले बाजारपेठेत नागाच्या मूर्त्या विक्रीस दाखल
