रानभाजी महोत्सव हा खरोखरच स्तुत्य उपक्रम

भरणी येथे रानभाजी उत्सवाचा सभापती मनोज रावराणे यांच्याहस्ते शुभारंभ

*⚡कणकवली ता.१२-:* मानवाच्या प्रामुख्याने तीन गरजा आहेत त्यात अन्न, वस्त्र, व निवारा. त्यामधील वस्त्र आणि निवारा आपल्याला मिळतोय पण आपले आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहाराकडे जास्त लक्ष दिले पाहिजे .यासाठी रासायनिक भाज्या न खाता या रानभाज्या व सेंद्रिय भाज्या खाव्यात तरच आपले आरोग्य चांगले राहील असे प्रतिपादन कणकवली पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांनी सांगितले.रानभाजी महोत्सव हा खरोखरच स्तुत्य उपक्रम असून यातुन शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळेल असेही मनोज रावराणे म्हणाले. महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालय कणकवली व शेतकरी सल्ला समितीच्यावतीने जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा भरणी येथे जागतिक आदिवासी दिन महोत्सव रानभाजी उत्सवाचा आणि प्रदर्शनाचा शुभारंभ कणकवली पंचायत समितीचे सभापती मनोज रावराणे यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आला.यावेळी पं. स. सदस्य तथा शेतकरी सल्ला समिती सदस्य गणेश तांबे यांनी सभापती मनोज रावराणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच . यावेळी आनंद साळसकर, उपविभागीय कृषी अधिकारी एस. एस हजारे, कृषी अधिकारी बी. तोरणे, शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष वसंत तेंडूलकर,भरणी सरपंच गुरव याचेही स्वागत करण्यात आले. या रानभाजी प्रदर्शनात गावतील शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध केल्या होत्या त्यामधे दुधुली, चवळी,आंबुशी,पेवगा, तोंडा, फोडशी, चीना,करादे, कुडाच्या शेंगा, एकपानी,शेवंग्याचा पाला, भारंगी, अंबाडा, घोटवेल, कुर्डू, आघाडा, अळू, सुरण, टाकळा, दिंडा,शेवरा,पिंपळ, उंबर,रताळी, शेडवल, कारटोली,पेवगा, पानांचा ओवा,बांबूचा कोंब,शा 22 पेक्षा जास्त रानभाजीची मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली होती.त्यामुळे या रानभाज्यांच्या प्रदर्शनामध्ये कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असल्याचे पाहायला मिळाले तसेच या महोत्सवात फोंडा कृषी महाविद्यालयाचे प्रा. ओगले यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले यावेळी पं. स. सदस्य तथा शेतकरी सल्ला समिती सदस्य गणेश तांबे, कृषी पर्यवेक्षक आर एस सावंत, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) व्ही.एम.पाटील,कृषी सहाय्यक रावराणे,व शेतकरी उपस्थित होते.

You cannot copy content of this page