नावळे धनगरवाडा हुबंरणेवाडीकडे जाणारा रस्ता खुला करा

स्वातंत्र्यदिनी ग्रामस्थ उपोषणाला बसणार;तहसील कार्यालयासमोर आंदोलन

*⚡वैभववाडी ता.१२-:* नावळे धनगरवाडा हुबंरणेवाडीकडे जाणारा रस्ता खुला करून मिळावा या मागणीसाठी स्वातंत्र्य दिनी येथील ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहे. तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करणार आहेत. याबाबतचे पत्र त्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहे. नावळे धनगरवाडा हुबंरणेवाडी रस्त्याचा प्रश्न गेले अनेक वर्षे रखडला आहे. या वाडीकडे जाण्यासाठी शासनाकडून १५ लाख खर्चून पापडी पुल बांधला आहे. मात्र वाडीपर्यंत वाहने जाण्यासाठी रस्ता नाही.त्यामुळे ३५ घरातील लोकांना तारेवरची कसरत करून शेताच्या बांधावरून जाव लागत आहे.आजारी व्यक्ती व गरोदर महीलांना घोंगडीत टाकून आणाव लागत आहे. शासनाकडे यासंदर्भात वेळोवेळी मागणी करून देखील रस्ता खुला करण्यात आला नाही.काही लोकांकडून जाणीवपूर्वकपणे या विषयावरून राजकारण केले जात आहे. स्थानिक प्रशासनाने या संदर्भात चुकीची माहिती वरिष्ठांना दिली आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे. सदर रस्ता खुला न ग्रामस्थ स्वातंत्र्य दिनी उपोषण छेडणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे

You cannot copy content of this page