कातवड येथे रानभाज्या महोत्सव संपन्न

ओरोस-:महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान (आत्मा) अंतर्गत ११ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या रानभाज्या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कातवड प्राथमिक शाळा येथे संपन्न झालेल्या महोत्सवात तालुक्यातील बारा बचतगट महिलांनी रानभाज्या प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. तर रानभाज्या पाककृती स्पर्धेत २५ रानभाज्या पदार्थ ठेवण्यात आले होते. आपल्या परिसरातील निसर्गामध्ये नैसर्गिक रित्या उगवणाऱ्या रानभाज्यांचे औषधी गुणधर्म व त्याचे महत्व कळावे, यासाठी आत्मा अंतर्गत मालवण तालुक्यातील कातवड शाळेमध्ये ११ ऑगस्ट रोजी दुपारी रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मनीषा वराडकर, सरपंच उदय नाईक, मंडळ कृषी अधिकारी अतुल कांबळे, मंडळ कृषी अधिकारी धनंजय गावडे, शेतकरी सल्ला समिती अध्यक्ष उदय दुखंडे, सदस्य भाग्यश्री चव्हाण, उज्वला दळवी, गीता चौकेकर, तालुका आत्मा समन्वयक निलेश गोसावी, ग्रामसेवक युती चव्हाण, मुख्याध्यापक श्री सावंत आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ डॉ विलास सावंत यांनी राणभाज्यांचे आहारातील महत्व व गुणधर्म या विषयावर मार्गदर्शन केले. धन्वंतरी संस्थेचे संदीप तळगांवकर यांनी औषधी वनस्पती आणि त्याचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केले. या प्रदर्शनात सहभागी बारा महिला बचतगटांना व रानभाज्या पाककृती सादर केलेल्याना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय नाईक, भालचंद्र चव्हाण, काशिनाथ चव्हाण, शिवराम चव्हाण, अनिल सुकाळे, वैभव नाईक, अरुण हळदणकर, श्री जावकर, गणेश चव्हाण, सुरेश परब, सुजय घाडी, राजाराम हळदणकर, प्रभाकर सावंत यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page