वेंगुर्ले तालुक्यातून नवोदय परीक्षेला बसले ४० परजिल्ह्यातील विद्याथी

पालकांनी घेतली भाजपकडे धाव; भाजपा शिष्टमंडळाने गटशिक्षणाधिकाऱ्याकडे केली चौकशीची मागणी

*⚡वेंगुर्ले दि.१२-:* नवोदय प्रवेश परीक्षा सन २० – २१ यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूल ह्या केंद्रावर १६९ विद्यार्थी – विद्यार्थीनी परीक्षेला बसले होते , त्यापैकी जवळ जवळ ३५ ते ४० विद्यार्थी घाटमाथ्यावरील जिल्ह्यातील होते . तसेच ५ वीच्या स्काॅलरशीप परीक्षेस ४ केंद्रावर ३५९ विद्यार्थी व ८ वीच्या स्काॅलरशीप परीक्षेस २ केंद्रावर १२५ विद्यार्थी बसले आहेत . ह्यापैकीही काही विद्यार्थी परजिल्ह्यातील असल्याची तक्रार पालकांनी भाजपा पदाधिकारी यांचे कडे केली असता भाजपा शिष्टमंडळाने वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी गोसावी यांची भेट घेऊन सदर प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी केली . जि.प. शिक्षण सभापती सौ.अनिषा दळवींनी अहवाल मागवला* —- भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सदर प्रकरणी जि.प. शिक्षण सभापती सौ अनिषा दळवी यांचेकडे तक्रार केली असता ताबडतोब सभापती यांनी गटशिक्षणाधिकारी गोसावी यांना सदर प्रकरणी चौकशी अहवाल पाठवावा असा आदेश दिला . गेल्या वर्षी सुद्धा अशाच पद्धतीने वेंगुर्ले तालुक्यात घाटमाथ्यावरील विद्यार्थी आणुन परीक्षेला बसवीले होते व ह्याची तक्रार सुद्धा करण्यात आली होती . सदर प्रकरण जिल्हापरिषदेच्या स्थायी व सर्वसाधारण सभेत चर्चिला गेला होता . परंतु सदर प्रकरणाचे पुढे काय झाले हे अद्याप समजले नाही . ज्या बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना दाखले दिले त्या हायस्कूलची तक्रार करुन कारवाईची भाजपा ची मागणी यावेळी गटशिक्षणाधिकारी गोसावी यांचेकडे भाजपा शिष्टमंडळाने लिखीत स्वरुपात तक्रार दाखल केली व परिक्षा केंद्र निहाय बसलेल्या विद्यार्थ्यांची नावासहीत यादीची मागणी केली . तसेच सदर यादी शाळानिहाय मीळावी अशी मागणी केली . येत्या चार दिवसात यादी देण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी गोसावी यांनी भाजपा शिष्टमंडळास दिले . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , तालुका चिटनीस नितिन चव्हाण , वजराठ सरपंच महेश राणे , उपसरपंच नितीन परब , शेखर परब , सूर्यकांत परब , प्रेमानंद भोसले इत्यादी भाजपा पदाधिकारी व पालक उपस्थित होते .

You cannot copy content of this page