ग्रामीण ग्राम पंचायत कर्मचारी संघटना करणार सीईओ कार्यालयासमोर उपोषण

जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांची माहिती

*⚡सावंतवाडी ता.१२-:* महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण याचा इशारा दिला होता. परंतु यावर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या मागण्या संदर्भात ग्रामपंचायत विभाग आरोग्य विभाग तसेच सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश दिले होते. परंतु या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीचे व समस्यांचे थेट निवारण करण्याचा अधिकार सामान्य प्रशासनाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना नाही. हा केवळ संघटनेची दिशाभूल करण्याचा प्रकार असून संघटना 15 ऑगस्ट 2021 च्या उपोषणावर ठाम असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर व सचिव सुहास बांबर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

You cannot copy content of this page