*⚡मालवण ता.१०-:* मालवण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब यांची पोलीस नाईक या पदावरुन पोलीस हवालदार पदी पदोन्नती झाल्याने मालवण बाजारपेठ येथील श्री देव रामेश्वर मांड रीक्षा स्टँडच्या वतीने गुरुप्रसाद परब यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. यावेळी दीपक बांदकर, सतीश धुरी, मनोज धुरी, प्रदीप मयेकर, राजू डिंगणकर, जयंत कामतेकर, गुरुनाथ शिरोडकर, नेल्सन बुतेलो आदी उपस्थित होते.
वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब यांचा सत्कार
