जिल्ह्यातील १८० पोलिसांच्या झाल्या प्रशासकीय बदल्या

ओरोस-: जिल्हा पोलिस दलातील बढत्या पाठोपाठ जिल्हा पोलिस दलातील तब्बल १८० पोलिस कर्मचार्यांच्या प्रशासकीय बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केल्या आहेत. जिल्ह्यातील १३ पोलिस ठाणी, पोलिस मुख्यालय तसेच पोलीस अधिक्षक भवनातील विविध विभाग यामधील पोलीस कर्मचार्‍यांच्या जिल्हान्तर्गत प्रशासकीय बदल्या झाल्या आहेत. सोमवारी सिंधुदुर्ग पोलिस दलातील ३६ पोलीसांच्या बढत्या झाल्यानंतर शासन निर्णयानुसार प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यात १८० बदल्या झाल्याने जिल्हातील सर्वच पोलीस ठाण्यात नवनवीन चेहरे दिसणार आहेत. पहिल्यादाच एवढा मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असून यानंतर विनंती बदल्याही होणार आहेत. या बदल्या नंतर जिल्हा पोलिसदलात रिक्त असलेल्या पदांची निश्चिती होणार आहे. जिल्ह्यातील १३ पोलिस ठाणी तसेच पोलिस मुख्यालय , पाेलिस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा , गुप्तवार्ता विभाग , जिल्हा वाहतूक शाखा , महिला अत्याचार निवारण कक्ष, सायबर क्राइम या विविध शाखांमधील बदल्यांचा यामध्ये समावेश आहे.

You cannot copy content of this page