*⚡सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी तालुक्यात आज ३० कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात १६ तर ग्रामीण भागात १४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सावंतवाडी २, खासकिलवाडा ४, सबनीसवाडा ६, भटवाडी ३, सर्वोदयनगर १ तर ग्रामीण भागात मळेवाड २, तळवडे १, नेतर्डे ३, बांदा १, आंबेगाव १, वेत्ये १, कोलगाव १, नेमळे ४ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात १८४ रुग्ण सक्रिय आहेत.
