प्रतिक सावंतच्या मालवणी ब्रँण्ड जर्सीचे राजे खेम सावंत भोसले यांच्या हस्ते लॉन्चिंग

*⚡सावंतवाडी दि.०९-:* स्पोर्ट क्षेत्रात अल्पावधीतच नाव लौकीक मिळविलेल्या सावंतवाडीचा सुपुत्र प्रतिक सावंत यानं खास मालवणी माणसांसाठी मालवणी ब्रॅण्ड तयार केला असून ‘आमची वाडी सुंदर वाडी, ‘आय लव्ह सावंतवाडी’ नावाची जर्सी तयार केली आहे. सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते या जर्सीच लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर, पत्रकार सीताराम गावडे,अखिलेश कानसे,विठ्ठल सावंत,गौतम सावंत,रीषी हरमलकर,आदि उपस्थित होते. गेली चार वर्ष माजगाव येथील प्रतीक सावंत यांनी उत्तम प्रतीची स्पोर्टसाठी लागणारी सर्व टी-शर्ट उपलब्ध करून दिली आहेत. आपली गुणवत्ता टिकून ठेवल्यामुळे दिवसेंदिवस त्याच्याकडे ग्राहकांची मागणी वाढत आहे. याचा विचार करून प्रतिकनं नवी मुंबई -घोनसली येथे टी-शर्ट तयार करण्याची फॅक्टरी सुरू केली आहे. सर्वप्रथम कापड विकत घेऊन त्यावर आपल्याला हवी तशी डिझाईन तयार करून ग्राहकांच्या पसंतीनुसार त्या डिझाईनचा वापर केला जातो व लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत टी-शर्ट बनवण्याचे काम या फॅक्टरीमध्ये केले जाते. त्या फॅक्टरी मधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात व जिल्हा बाहेरही प्रतिक स्पोर्टने आपली टी-शर्ट वितरीत केली आहेत. उत्तम प्रतिची कॉलिटी कायम ठेवल्यामुळे त्याच्याकडे क्रीडा प्रेमीही आकर्षित होतात. तरी देणे लागतो म्हणून प्रतिक याने आमची वाडी ,सुंदर वाडी, आय लव्ह सावंतवाडी,अशा नावाची जर्सी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले व युवराज लखन राजे भोसले यांच्या शुभहस्ते लॉन्चिंग केली , यावेळी खेम सावंत भोसले यांनी प्रतीक च्या या धाडसाचे कौतुक करून अल्पावधीत सर्व सावंतवाडीयांच्या अंगावर आमची वाडी सुंदर वाडी, आय लव्ह सावंतवाडी,ही जर्सी दिसेल असा विश्वास व्यक्त केला, तर प्रतिक स्पोर्ट कडून शाळा महाविद्यालय आदींनी ही अशा प्रकारची दर्जेदार टी-शर्ट खरेदी करावी असे आवाहन केले. आमची वाडी सुंदर वाडी ची जर्सी न्यू स्टेप,संचयनी पॅलेस, मिलिंद देसाई,व ओसिझन , अभिजित बावकर संचयनी रोड सावंतवाडी यांच्या दुकानाध्ये अवघ्या ३००रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत,अधिक माहिती साठी ८५५०९०८६६० प्रतिक सावंत यांच्या शी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page