पोलीस कर्मचारी बाबा गिरकर, गुरुप्रसाद परब यांना पदोन्नती

*⚡मालवण दि.०९-:* सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यातील सुमारे ३६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली असून या पदोन्नतीत मालवणच्या दोन पोलिसांना संधी प्राप्त झाली आहे. मालवणचे पोलीस हवालदार बाबा गिरकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तर गुरुप्रसाद परब यांना पोलीस हवालदार म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. मालवण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार बाबा गिरकर यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. तर वाहतूक पोलीस गुरुप्रसाद परब यांची नाईक पदावरून पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलीस अंमलदार यांचे अभिनंदन व शुभेच्छा अशा आशयाच्या शुभेच्छा संदेशासह पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी पदोन्नती दिल्या आहेत.

You cannot copy content of this page