शौर्य जाधव वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

दादर नायगाव येथील प्रभावती कुलकर्णी विद्यालयाने केले होते आयोजन

*⚡देवगड ता.०९-:* लोकसेवा संघाच्या प्रभावती कुलकर्णी प्राथमिक विद्यालय,नायगाव दादर या शाळेतील आयोजित वक्तृत्व स्पर्धेत शौर्य निलेश जाधव याने प्रथम क्रमांक पटकाविला. या विद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या जयंती निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्ध्येच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्ध्येत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये शौर्य निलेश जाधव याने लोकमान्य टिळक यांची वेशभूषा करून उत्कृष्ठरित्या भाषण सादर केलं.यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला मिळालेल्या प्रथम क्रमाका बद्दल त्याला प्रमाणपत्र देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. शाळेच्या मुख्यध्यापिका प्रियांका शिंदे,संस्थेचे अनंत कुलकर्णी तसेच नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page