सहा.पोलीस निरीक्षक महेंद्र घाग ऍक्शन मोडमध्ये..
*⚡दोडामार्ग दि.सुमित दळवी-:* दोडामार्ग तालुक्यातील अवैद्य दारू व्यवसाय व मटका अड्ड्यावर दोडामार्ग पोलिसांनी करडी नजर ठेवली असून,मागील दोन चार दिवसांत दोडामार्ग सहा.पोलीस निरीक्षक महेंद्र घाग व त्यांच्या सहकाऱ्यांनी मटका अड्ड्यावर धाड टाकून रक्कम व मटका साहित्य ताब्यात घेतले होते.याचबरोबर मटका बुकींनाही अटक करण्यात आली होती. दोडामार्ग सहा.पोलिस निरीक्षक महेंद्र घाग यांनी अवैद्य धंद्यावर करडी नजर ठेवली असल्यामुळे अवैद्य धंदे चालक यांची दाणादाण उडाली आहे.त्याच बरोबर रात्रीच्या वेळी काळोखाचा फायदा उठवत चोरट्या मार्गाने वाहतूक करण्याऱ्यावरही लक्ष ठेवण्यासाठी गुप्त पथके तयार करून कामाला लावली आहे.पोलिसांनी अशा स्वरूपाच्या बेकायदा व्यवसायांवर व काळ्या धंद्यांवर अशीच करडी नजर ठेवावी आणि कायद्याचा धाक निर्माण करावा,अशी मागणी नागरिक करीत आहेत.
