आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थानतर्फे पूरग्रस्तांना मदत

चिपळूणपासून 40 कि.मी.वर असलेल्या पोसरे, चोरवणे गावात घेतली धाव

*⚡मालवण दि.०५-:* चिपळूण पासून सुमारे चाळीस किलोमीटरवर असलेल्या पोसरे, चोरवणे या गावी जात आचरा येथील इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान तर्फे दूर्गम भागातील पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. चिपळूण परीसरात पूरस्थिती येवून गेल्याला अनेक दिवस उलटून गेले तरी याभागातील परीस्थिती पूर्व पदावर आली नाही आहे. शहरी भागाबरोबरच काही ग्रामीण भागातली स्थिती भयानक आहे. रस्ते खचलेत, भूस्खलनाने डोंगराची माती रस्त्यावर येवून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा स्थितीमुळे ग्रामीण भागातील पूरग्रस्तांपर्यंत मदतीचा ओघ पोहोचने दूरापास्थ बनले आहे. याची जाणीव झालेल्या आचरा देवस्थान समिती तर्फे चिपळूण पासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खेड तालुक्यातील पोसरे, चोरवणे या गावात खडतर प्रवासाने जाउन पूरग्रस्तांना मदत दिली. यात चोरवणे येथील हनुमंतवाडी, डांगेवाडी, सीमेचीवाडी,सुतार वाडी याभागाला जोडणारा पूल अर्धा वाहून गेल्याने मुख्य रस्त्यापासून संपर्क तुटला आहे. तरी आचरा देवस्थान समितीचे अध्यक्ष मिलिंद मिराशी , अशोक पाडावे,प्रशांत खोत,कर्मचारी बाबा देसाई, राजू घाडी, मकरंद परब यांसह आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, तसेच रविंद्र गुरव,रुपेश साटम,अनंत गावडे, महेश मुळये,वैभव सक्रू,मनोज भावे,नयन भिरवंडेकर आदींनी येथील ग्रामस्थांच्या मदतीने डोक्यावर धान्य नेत शिडीवरुन पूल ओलांडून पूरग्रस्तांना मदत पोहोचवली. अतिशय दुर्गम भागातही जात चोरवणे येथील प्रत्येक पूरग्रस्तांना मदत दिली. चिपळूण शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही रात्री उशिरापर्यंत मदत वाटप करत आचरा येथील रामेश्वर देवस्थान समितीकडून सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.त्यांच्या या सहकार्याने भारावलेल्या पूरग्रस्तांनी क्रूतज्ञता व्यक्त केली.

You cannot copy content of this page