*⚡मालवण दि.०४-:* मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथचे माजी सरपंच रावजी उर्फ कमलाकर पांडुरंग चव्हाण (६९) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.आज सकाळी वायरी भूतनाथ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वायरी भूतनात येथील कमलाकर चव्हाण यांनी आपल्या उमेदीच्या काळात गावाच्या प्रश्नासाठी आंदोलने करून विकासाचे प्रश्न मार्गी लावले वायरी भूतनाथ येथील युवकांना सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांद्वारे संघटित करून एक चळवळ उभी केली. गावातील राजकीय परिस्थितीवर त्यांची पकड होती. मालवण येथील गाजलेल्या सिंधुदुर्ग किल्ला झेंडा आंदोलनात श्री चव्हाण यांचा सक्रिय सहभाग होता ९० च्या दशकात मालवणमध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले. शिवसेना वाढीसाठी श्री चव्हाण यांनी केलेले कार्य नेहमीच अधोरेखित ठरणारे आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पुतणे, नातू असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी शाखा प्रबंधक सत्यप्रकाश चव्हाण यांचे ते बंधू होत
वायरी भूतनाथचे माजी सरपंच रावजी उर्फ कमलाकर पांडुरंग चव्हाण यांचे निधन
