व्यापाऱ्यांना रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी

मालवण व्यापारी संघाच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची घेतली भेट

*⚡मालवण दि.०४-:* कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे दिलासादायक चित्र असल्याने शासनाने व्यापाऱ्यांना दुकाने खुली ठेवण्यासाठी दिलेली सायंकाळी ४ वाजेपर्यंतची वेळ वाढवून रात्री ८ वाजे पर्यंत दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मालवण व्यापारी संघाच्या शिष्ट मंडळाने मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेऊन केली आहे. कोरोना निर्बंधामुळे व्यापारी वर्गाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आज मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान व्यापाऱ्यांनी मालवण सोमवारपेठ येथे आठवडा बाजार पुन्हा भरविण्यात यावा , परजिल्ह्यातील येणाऱ्या व्यापाऱ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करणे, तसेच गणेश चतुर्थी सण येत असल्याने येणाऱ्या चाकरमान्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे याविषयी सविस्तर चर्चा केली. यावेळी व्यापारी संघ अध्यक्ष उमेश नेरुरकर, प्रमोद ओरसकर, अशोक सावंत, नाना पारकर, दशरथ कवठकर, हर्षल बांदेकर, हेमंत शिरगावकर, एकनाथ हळदणकर, बबन तळवडेकर, हेमंत शिरपुटे, सदा माडये, हरेश देऊलकर, बशीद अथनिकर आदी व्यापारी उपस्थित होते. गणेश चतुर्थी एक महिन्यावर येऊन ठेपल्याने कोरोनामुळे सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्याचा जो निर्बंध शासनाने घातला आहे तो गणेश चतुर्थी एक महिन्यावर येऊन ठेपल्याने हटविण्यात यावा, व त्याची वेळ रात्री ८ वाजे पर्यंत करावी अशी आग्रही मागणी केली. तसेच जे परजिल्ह्यातील व्यापारी आठवडा बाजारासाठी मालवणात येतात त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी. तसेच गणेश चतुर्थीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांची देखील आरटीपीसीआर टेस्ट करावी, जेणेकरून कोरोनाचा प्रसार होणार नाही, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी केली. यावेळी नगराध्यक्ष श्री कांदळगावकर यांनी दुकांनाच्या वेळा वाढवून देण्याबाबत तसेच बाजारपेठेत दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार पुन्हा भरण्याबाबत सर्व सहमतीने लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ. सध्य स्थितीत सिंधुदुर्गात कोरोना बाबत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम आहेत. एकूणच कोरोना कालावधीत सर्वच व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. याचा विचार करता आगामी गणेशोत्सव पार्श्वभूमीवर व्यापारी बांधवाना दिलासा देण्यासाठी निश्चितच सकारत्मक भूमिका घेतली जाईल. असे सांगून नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी सोमवारी मालवण शहरात विविध ठिकाणी भाजी, फळे व अन्य व्यापाराच्या निमित्ताने अनेक व्यापारी बाहेरून दाखल होतात. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता बाहेरून येणाऱ्या या व्यापारी वर्गाची पुढील सोमवार पासून ऑन दि स्पॉट कोरोना चाचणी केली जाईल असे सांगितले

You cannot copy content of this page