*⚡वेंगुर्ले ता.०४-:* महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास परिषद सिंधुदुर्गच्या उपाध्यक्षपदी वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा गावचे सामाजिक कार्यकर्ते कार्मीस आल्मेडा यांची निवड अध्यक्ष व्हिक्टर फर्नांडिस यांनी केली. यावेळी जिल्हा व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यारणीत श्री. अगोस्तिन फर्नांडिस ( उपाध्यक्ष ) श्री. एडविन डिसोजा ( सचिव ), श्री. लोरेन्स मान्येकर(कार्याद्यक्ष), श्री. मार्टिन आल्मेडा ( खजिनदार ), श्री. जासिंत लोबो ( सह खजिनदार ), श्री. मॅक्सि फर्नांडिस,कुडाळ ( संपर्क प्रमुख ), श्री. रुजारिओ उर्फ बाबला पिंटो ( मार्गदर्शक ), श्री. अगोस्तिन डीसोजा (संघटक मालवण ), श्री. कामिल जेराल ( प्रसिद्धी प्रमुख ), श्री. बेनी डीसोजा, श्री. रोबर्ट डीसोझा, तसेच तालुका अध्यक्ष मध्ये श्री. सायमन आल्मेडा ( वेंगुर्ला अध्यक्ष ), श्री. रिचर्ड डिसिल्वा कुडाळ तालुका, श्री. लूईस डीसोझा (कणकवली ) श्री. पास्कोल रोड्रिक्स ( मालवण ), श्री. मायकल लोबो ( दोडामार्ग ) श्री. विल्यम सालदाना ( सावंतवाडी ) यांची निवड करण्यात आली आहे. ख्रिस्ती समाजाचे वेगवेगळे प्रश्न शासन स्तरावर पाठ पुरावा करणे, अल्प संख्याक लोकांना आलेल्या वेगवेगळ्या योजना समाजा पर्यंत पोहचविणे, युवा वर्गाला रोजगार निर्मितीसाठी कर्ज योजना, शासन स्तरावर अल्प संख्याक निधीसाठी पाठपुरावा करणे, अल्प संख्याक चे जिल्ह्यात कार्यालय उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणे, तसेच स्कॉलरशिप सारखे विषय शासन स्तरावर मांडणे व ख्रिस्ती लोकांच्या समस्या शासन स्तरावर घेऊन जाणे इत्यादी कामे या समितीद्वारे करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक विकास परिषद सिंधुदुर्गच्या उपाध्यक्षपदी कार्मीस आल्मेडा
