कणकवलीत पुराचे पाणी कातकरी झोपड्यात घुसले;

संसार गेला वाहून

💫कणकवली दि.२२-: जाणवली नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्याने हे पाणी अचानक कातकरी वस्तीत आले त्यामुळे आठ कुटुंबे उघड्यावर आली आहेत.
कणकवली निम्मेवाडी गावळदेव येथे राहत असणाऱ्या कातकरी कुटुंबियांच्या झोपडीत जाणवली नदीचे पाणी घुसले.या कुटूंबाचा धान्य,कपडे,भांडी असा संपूर्ण संसार वाहून गेला.
नदीने रौद्ररूप धारण केले त्यावेळी वाड्यावर गरोदर महिला आणि छोटी बालके होती.पुरुष मंडळी मजुरीसाठी बाहेर गेले होते. अचानक पाणी वाढल्याने त्यांनी स्वतःचा जीव वाचविला मात्र संसार वाहून गेला.हे वृत्त कळताच अखंड लोकमंचचे अध्यक्ष चित्रकार नामानंद मोडक यांनी निम्मेवाडी येथे धाव घेतली आणि कुटूंबियांना आपल्या घरी आणून आश्रय देत मदत केली

कातकरी कुटूंबातील एका महिलेने आणि तीन बालकांनी पुराच्या पाण्यातुन बाहेर येत आपला जीव वाचविला.मात्र कातकरी बंधवांच्या झोपड्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे अन्न धान्य वाहून गेले.खुऱ्याड्याखालील कोंबड्या आणि काही बकऱ्या पाण्यात वाहून गेल्याची शक्यता आहे. यावेळी शैला कदम यांनी या छोट्या मुलांना आधार देत त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.

You cannot copy content of this page