वाहतूक पूर्णपणे ठप्प
💫कणकवली दि२२-: मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्यातील कनेडी-नाटळ नरडवे रोडवरील मल्हार नदीवरील पुलाला तडे जात रस्ता खचला होता आता हा ब्रिजच कोसळला आहे .त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे नरडवे , नाटळ, दिगवळे , दारीस्थे या गावांचा संपर्क तुटला आहे.
काही दिवसापूर्वी पिलरखालील कॉंक्रीट वाहून सळ्या बाहेर येऊन गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत यांनी अभियंता शेवाळे तसेच पवार यांच्या निदर्शनास आणून दिले होते. आज जोरदार पावसाने हे पुलंच वाहून नरडवे नाटक दिगवळे दारीस्थे व इतरही गावांची संपर्क तुटला असून वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे.
