*💫वेंगुर्ला दि.१२-:* वेंगुर्ला शहरासह तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु असल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला आहे. मान्सून सक्रीय झाल्यानंतर अधूनमधून पावसाचे बरसणे सुरुच होते. ऊन-पावसाच्या लपंडावामुळे ऐन ज्येष्ठ महिन्यात श्रावणसरींचा अनुभव लोक घेत होते. पण गेले पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे जनविस्कळीत न होता ते सुरळीत सुरु आहे. वेंगुर्ला तालुक्यात रविवारी सकाळी ८ ते सोमवार सकाळी ८ या कालावधीत ९५.४ मि.मि. तर १ जून ते १२ जुलै पर्यंत ११४१.१० मि.मी.एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
संततधार पावसाने गारठा
