मेरीटमध्ये झळकले सतरा विद्यार्थी
*💫मालवण दि.१२-:* विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या आचरा पिरावाडी येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे प्राथमिक शाळेने ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेतही यशाची परंपरा कायम ठेवत या स्पर्धा परीक्षेत सतरा विद्यार्थ्यांनी मेरीट मध्ये येत घवघवीत यश संपादन केले आहे. याशाळेचे ऐश्वर्या तोडणकर इयत्ता पहिली,,उर्वी आचरेकर,निरजा वारंग इयत्ता दुसरी,स्वरा तळवडकर इयत्ता तीसरी,म्रूणाल धुरी इयत्ता चौथी यांनी सुवर्ण पदक मिळविले,इयत्ता पहिलीचे विद्यार्थी भक्ती जोशी,त्रूषा कोळंबकर,श्रीश तारी,सान्वी कुबल, इयत्ता पाचवीचा विद्यार्थी रुद्र जाधव यांनी सिल्व्हर मेडल तर इयत्ता दुसरीचा कैवल्य नलावडे, इयत्ता तीसरीच्या श्रावणी गवळी,मयुरेश धुरी,श्रावणी पोटघन,चैत्राली धुरी,इयत्ता चौथीचा आयुष बाणे,इयत्ता पाचवी वीर आचरेकर यांनी ब्रान्स पदक मिळविले यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नित्यानंद तळवडकर,उपाध्यक्षा भावना कुबल, मुख्याध्यापक सुभाष नाटेकर, सर्व शिक्षक, , पालक शिक्षक संघ,माता पालक संघ,ग्रामोन्नती मंडळ पिरावाडी यांनी अभिनंदन केले आहे.
