*💫सावंतवाडी दि.१२ -:* सावंतवाडी तालुक्यात आज १९ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात १७ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात भटवाडी १, सावंतवाडी १ तर ग्रामीण भागात इन्सुली १, मळगाव २, कोलगाव १, आंबेगाव २, बांदा ४, नेतर्डे २, नेमळे १, शिर शिंगे १, तळवडे १, आंबोली १, सावरवाड १ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात २४३ रुग्ण सक्रिय आहेत.
