*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कणकवली व देवगड तालुक्यात सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात सरासरी ३२.५० मि.मी. पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी १३२३.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 36(1386), सावंतवाडी – 27(1538.10), वेंगुर्ला – 19(1057.20), कुडाळ – 17(1189), मालवण – 35(1472), कणकवली – 45(1392), देवगड – 45(1220), वैभववाडी – 36(1337), असा पाऊस झाला आहे.
कणकवली व देवगड तालुक्यात सर्वाधिक ४५ मि.मी. पाऊस…
