आझाद हिंद संघटनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा
*💫कणकवली दि.११-:* पैठण-आपेगाव येथील श्रोक्षेत्र ज्ञानेश्वर माऊली जन्मस्थान येथील दिंडी प्रस्थानास राज्य शासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या भागातील वारकऱ्यानी १२ जुलै रोजी मंत्रालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. तत्पूर्वी या दिंडीला मुख्यमंत्र्यांनी परवानगी द्यावी, अशी मागणी आझाद हिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. सतीश रोठे-पाटील यांनी एका निवेदनाद्दारे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या दरम्यान एकाद्या वारकऱ्याने आत्मदहन केल्यास राज्यातील एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही या निवेदनात दिला आहे. या निवेदनाच्या प्रती राज्यातील जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत संघटनेच्या स्थानिक पदाधिकार्यांमार्फत सादर करण्यात आल्या आहेत. कणकवलीतील कोकण प्रदेश अध्यक्ष भाई गणपत चव्हाण यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार यांना पाठविल्यात आहेत. आपेगाव जि. औरंगाबाद येथील या दिंडी प्रस्थान सोहळ्यास ८४२ वर्षांची परंपरा आहे. शासनाच्या गँझेटमध्ये नोंद आहे. यासंदर्भात वारकर्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांशी अनेकदा पत्र व्यवाहार करण्यात आला आहे. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने वारकऱ्यानी नाईलाजाने हा सामुदायिक आत्मदहना इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने या दिंडीस परवानगी न दिल्यास आझाद हिंद संघटना या आंदोलनात सहभागी होईल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी शासनाची राहील असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.
