सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असणारे सर्व चेक नाके खुले करण्यात यावे

*शिवशंभू महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने गोवा मुख्यमंत्र्यांकडे मागणी*

*💫सावंतवाडी दि.१०-:* गोवा राज्यालगत सिंधुदूर्ग जिल्ह्याला लागून असणारे सर्व चेक नाके लवकरात लवकर खुले करण्यात यावे, अशी मागणी शिवशंभू महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने आज गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत लवकरात लवकर सिंधुदूर्ग जिल्ह्याला लागून असणारे सर्व चेक नाके खुले करण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले. यावेळी दोन लस घेतल्यानंतर गोव्यात प्रवेश देण्याचा निर्णय होता तो एक डोस घेतल्यानंतर प्रवेश द्यावा, अशी विनंतीही संघटनेच्यावतीने करण्यात आली. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री सावंत यांनी दिले. यावेळी शिवशंभू संघटना महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष समीर सावंत, सिंधुदूर्ग जिल्हा कार्याध्यक्ष रामचंद्र कवठणकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष यामेश्वर कवठणकर, सदस्य उमेश मांजरेकर, वैभव चोडणकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page