जिल्हा महिला कॉंग्रेसची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
*💫सावंतवाडी दि.१०-:* केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल आदी जीवनावश्यक वस्तूंवरील महागाई कमी करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हामहिला काँग्रेस कमिटीच्या वतीने सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले की, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलसह इतर जीवनावश्यक वस्तूंची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या महागाईने जनतेचे जगणे मुश्कील केले असून या जीवघेण्या महागाईमुळे महिलांना कुटूंब चालवणे सुद्धा अडचणीचे झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महागाई कमी करावी तसेच सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर पूर्वीप्रमाणे आटोक्यात आणावेत तसेच गॅसचे ही दर कमी करण्यात यावे अशी करण्यात आली आहे यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्षा साक्षी वंजारी, रुपाली सावंत,सावंतवाडी तालुकाध्यक्ष स्मिता वागळे, कुडाळ तालुकाध्यक्ष सुंदरअल्ली स्वामी आदी उपस्थित होते.
