मालवणात सायकल बँकेचे उद्घाटन

खासदार सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसानिमित्त जनशिक्षण संस्थेचे आयोजन

*💫मालवण दि.१०-:* खासदार सुरेश प्रभू यांच्या वाढदिवसा निमित्त जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व गोवा विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने मानव साधन विकास संस्था संचालित परिवर्तन केद्र संकल्पनेतर्गत मालवण तालुका सायकल बँकचे उद्घाटन रविवार दि ११ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वा कन्याशाळा मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सायकल बँक अंतर्गत अ. शि. दे. टोपिवाला हायस्कुल, कृ. शि. देसाई शिक्षण मंडळ, डॉ.श्रीधर शांताराम कुडाळकर हायस्कुल या हायस्कुल मधील प्रत्येकी दहा विद्यार्थिनीना मोफत सायकल देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला डॉ. सुभाष दिघे, मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, श्रीपाद पंतवालावलकर, दिगंबर सामंत, भालचंद्र राऊत, मालवण पञकार समितीचे अध्यक्ष संतोष गावडे, नगरसेवक गणेश कुशे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे तरी संबंधितांनी उपस्थित राहावे असे आवाहन जनशिक्षण संस्था सिंधुदुर्ग उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी केले आहे

You cannot copy content of this page