आ केसरकर:यापुढे बदनामी खपवून घेणार नाही
*💫सावंतवाडी दि.१०-:* शहरात वॉटर एटीएम मध्ये ९ लाखाचा झालेल्या भ्रष्टाचारावर नगराध्यक्ष संजू परब यांनी स्पष्टीकरण द्यावे असे आवाहन आमदार दीपक केसरकर यांनी केले आहे. संजू परब स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपले नाव घेत आहेत. असे देखील यावेळी म्हणाले आहेत. त्या कामांसाठी एमटीडीसी ने ठेकेदार नेमला होता. त्यामुळे त्या कामाबाबत आमच्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांना जाब विचारावा असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत. यापुढे नको त्या गोष्टीत आपले नाव घेतल्यास खपवून घेणार नाही. असा इशारा आमदार दिपक केसरकर यांनी दिला आहे.
