माझ्यावरील संजू परब यांचा आरोप चुकीचा

आ केसरकर:कोण पैसे खातेय ते बाजारपेठेत फिरुन माहिती घेण्याचे केले आवाहन

*💫सावंतवाडी दि.१०-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी शहरातील उद्यान आणि हेल्थ पार्क मध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप चुकीचा असून, पैसे खाण्याची सवय आपणाला नाही. कोण पैसे खात आहे हे संजू परब यांनी बाजारपेठेत फिरून माहिती करून घ्यावे. अशी टीका माजी पालकमंत्री तथा आमदार दिपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले

विकास कामांसाठी जमिनी ताब्यात घेण्यासाठी पैसे पालिकेला देऊनही पालिकेने अजूनही जमिनी ताब्यात घेतल्या नाहीत. तौक्ते वादळाची पूर्वकल्पना देऊनही सावंतवाडीतील नाट्यगृहाचे छप्पर उघडे करून ठेवण्यात आले होते. या भ्रष्टचार प्रकरणी आपली तक्रार कोणाकडेही करावी, शहरात विकासासाठी आपण नेहमी काम करणार असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सावंतवाडी शहर स्वच्छ, सुंदर राहण्यासोबत भ्रष्टाचार मुक्त राहणे गरजेचे आहे. असे देखील ते म्हणाले आहेत. एमटीडीसी ही स्वाहत्त संस्था असून, त्यांना काम दिल्यानंतर ते योग्य रित्या होते की नाही, हे पाहणे त्या भागातील सवाहत्त संस्थेची जबाबदारी आहे. असे देखील आमदार दिपक केसरकर यावेळी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी संजू परब यांना दोन वर्षात काय काम केले ते जाहीर करावे. असे आवाहन दिले आहे. त्यानी आतापर्यंत केलेली उद्घाटन ही माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कारकिर्दीत मंजूर झाली होती. असे देखील ते म्हणाले आहेत. यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजिन लोबो, अशोक दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page