*💫कणकवली दि.१०-:* मीरा भाईदरच्या शिवसेना महिला आघाडी धडाडीच्या कार्यकर्त्या सौ.जयलक्ष्मी जयराम सावंत यांची शिवसेना महिला आघाडीच्या मीरा भाईदर उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.जयलक्ष्मी सावंत या सावंतवाडी तालुक्यातील सांगेली हे सासर असून त्या कणकवली तालुक्यातील ओझरम हे त्यांचे माहेर आहे. सौ.जयलक्ष्मी जयराम सावंत या शिवसेनेच्या कट्टर कार्यकत्या ओळखल्या जातात.त्यांचा संघटनेच्या सर्व उपक्रमामध्ये तसेच सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग असतो.सध्या त्या मीराभाईदर शहर संघटक म्हणून कार्यरत होत्या.त्यांच्या कार्याची दखल घेऊन तसेच शिवसेना पक्ष संघटना वाढीसाठी त्यांना बढती देऊन त्यांची शिवसेना महिला आघाडीच्या मीरा भाईदर उपजिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सौ.जयलक्ष्मी सावंत यांचे शिक्षण कासार्डे माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले आहे.कासार्डे माध्यमिक विद्यालयातील सन १९९०/९२ दहावी-बारावी बॅचच्या याराना मित्रपरिवार या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या सक्रीय सदस्या आहेत.
शिवसेना महिला आघाडीच्या मीरा भाईदर उपजिल्हा संघटकपदी जयलक्ष्मी सावंत
