कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडेंची माहिती
*💫सावंतवाडी दि.१०-:* केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता महागाईत होरपळून गेली आहे. त्या विरोधात सिंधुदुर्गात केंद्र सरकार विरूद्ध काँग्रेसने महा आंदोलन पुकारले होते. परंतु, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केला असल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून, जमावबंदी उठल्यावर काँग्रेस कडून महा आंदोलन पुकारण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी, तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, इर्शाद शेख, समीर वंजारी, बाबू गवस आदी उपस्थित होते.
