नाम.नारायण राणेंनी पदभार स्विकारताच भाजपतर्फ़े कणकवलीत जिलेबी वाटप

राणेंच्या केंद्रीय मंत्री पदामुळे सिंधदुर्गच्या विकासाला गती मिळणार: संजना सावंत

*💫कणकवली दि.०८-:* सुक्ष्म लघु व मध्यम उद्योग केंद्रीय मंत्रीपदाची नारायण राणे यांनी शपथ घेतली,त्याबद्दल कणकवली तालुका भाजप व कणकवली शहर भाजपच्यावतीने पटवर्धन चौकात नागरिकांना जिलेबी वाटप करण्यात आले.तसेच फटाके फोडत घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म,लघु व मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री वर्णी लागल्याने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.तसेच नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपदाची जबाबदारी सोपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे,असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांनी केले. यावेळी सभापती मनोज रावराणे,उपसभापती प्रकाश पारकर,नगराध्यक्ष समीर नलावडे,माजी जि.प.अध्यक्ष संदेश सावंत,तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री,जि.प. सदस्य श्रेया सावंत,नगरसेवक संजय कामतेकर,अभिजित मुसळे,विराज भोसले,अण्णा कोदे,शिशिर परूळेकर,राजश्री धुमाळे,प्रज्ञा ढवण,नगरसेविका मेघा गांगण,कविता राणे,महिला शहरअध्यक्षा प्राची कर्पे,साक्षी वाळके,संजना सदडेकर,संदीप मेस्त्री,गणेश तळगावकर,महेंद्र साम्ब्रेकर,भरत उबाळे,समर्थ राणे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. .

You cannot copy content of this page