*💫सावंतवाडी दि.०८-:* माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदी वर्णी लागल्यानंतर सावंतवाडी शहरात भाजप मध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून, भाजप आणि राणे समर्थक यांच्याकडून सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. सावंतवाडी शहरात आज जय प्रकाश चौक येथे आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करून आनंदोत्सव साजरा केला आहे. यावेळी भाजप युवक शहर अध्यक्ष संदेश टेमकर, शंभू विर्नोडकर आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सावंतवाडीतिल जयप्रकाश चौकात आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्याकडून फटाक्यांची आतषबाजी
