विहिंपतर्फे सावंतवाडी नगरपरिषदेस पिपीई किट वितरण

*💫सावंतवाडी ता.०८-:* विश्व हिंदू परिषदेच्या सावंतवाडी प्रखंड माध्यमातून आणि डॉ.दिलीप पवार, वैद्यकीय शास्त्रज्ञ व सामाजिक कार्यकर्ते यांच्या सौजन्याने सावंतवाडी नगरपरिषदेस १५० पिपीई किट देण्यात आली. यावेळी विश्व हिन्दू परिषदेचे जिल्हा कोषाध्यक्ष रवि सातावळेकर, विश्व हिंदू परिषदेचे सावंतवाडी प्रखंड- मंत्री लक्ष्मीकांत कराड, विश्व हिंदू परिषद प्रखंड सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य सुनील सावंत, गौरव शंकरदास, महादेव राऊळ आदी उपस्थित होते. यावेळी श्रीम. शिरोडकर यांनी विश्व हिन्दू परिषदेने दिलेल्या पिपीई किट बद्दल आभार मानून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याना याचा उपयोग होणार असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page