*💫कणकवली दि.०७-:* खास. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे आता खास. नारायण राणे केंद्रीय मंत्री म्हणून कार्यभार सांभाळायला सिद्ध झाले आहेत.कणकवली तालुक्यातील नांदगाव या राणेंच्या आजवळी जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला आहे . मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील पहिला मंत्रीमंडळ विस्तार आज सायंकाळी ६ वाजता संपन्न झाला. यावेळी कोकणचा कणखर आवाज खास. नारायण राणे यांनी आपल्या मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे कोकणातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच राज्यभरातील राणेसमर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. विभागातील भाजपाने नांदगाव तिठा येथे एकच जल्लोष केला आहे फटाक्यांची आतषबाजी व राणे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. अशा घोषणा देत नांदगाव परिसर दणाणून सोडला तर लाडू पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके,तालूका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव भाजपचे शक्तीकेंद्र प्रमुख भाई मोरजकर, नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर उपसरपंच निरज मोरये, संतोष परब, संतोष वायंगणकर,आयनल सरपंच बापू फाटक,तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, मंदार गुरव, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील, कमलेश पाटील, अवधूत गगनग्रास, कमलाकर महाडिक , विलास कांडर, योगेश सदडेकर , सुनिल बोभाटे ,पप्पी सापळे ,लक्ष्मीकांत पेडणेकर, मनोज पारकर , शैलेश इंदप ,सुशिल इंदप,चंदू शिंदे,चंदू मोरये,श्रीकांत टाकळे, श्रीकृष्ण वायंगणकर,बबन मोरये आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री पदाची शपथ घेताच राणेंच्या नांदगाव येथील आजोळी जल्लोष केला साजरा
