खारेपाटण येथे फटाके वाजवून कार्यकर्त्यांचा जल्लोष

*💫कणकवली दि.०७-:* कोकणचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भाजपचे खासदार नारायण राणे यांची आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात केंद्रीय मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल खारेपाटण शहरात भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने फटाके वाजवून व पेढे वाटून आनंददायी जल्लोष साजरा करण्यात आला. खारेपाटण बसस्थानक येथे भाजपा कार्यकर्ते शेखर शिंदे,महेश राऊत,गणेश कारेकर यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.तर खारेपाटण रामेश्वरनगर येथे भाजपाचे कार्यकर्ते मंगेश गुरव,सुधीर कुबल,राजेंद्र वरुनकर,शेखर कांबळे आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामस्थ देखील उपस्थित होते.

You cannot copy content of this page