बांदा शहरातील उड्डाणपूल कामाचे भूमिपूजन

*💫बांदा दि.०७-:* मुंबई-गोवा महामार्गावर राष्ट्रीय महामार्ग विभागाने मंजूर केलेल्या बांदा शहरातील ६०० मीटर लांबीच्या उड्डाणपूल कामाचे भूमिपूजन आज सायंकाळी उशिरा सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांच्या हस्ते संपन्न झाले. या कामासाठी ८० कोटी रुपयांच्या अंतिम आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. याठिकाणी उड्डाणपुल व्हावा यासाठी वाफोली येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी २६ जानेवारी २०१९ रोजी उपोषण करून राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधले होते. तब्बल दीड वर्षे आईर यांनी उड्डाणपूल होण्यासाठी राज्य तसेच केंद्र शासनापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळेच राष्ट्रीय महामार्ग विभागाने येथील उड्डाणपूल व सटमटवाडी येथे भुयारी मार्गाला मंजुरी दिली आहे. एकूण ६०० मीटर लांबीच्या उड्डाणपूलाचा आराखडा व रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. आज बुधवारी सांयकाळी याठिकाणी खोदाई करण्यासाठी दोन बोरिंग मशीन दाखल झाल्या आहेत. संजय आईर यांच्या हस्ते विधिवत भूमीपुजन करण्यात आले. त्यानंतर लागलीच याठिकाणी बोरिंगचे काम सुरू करण्यात आले. यावेळी उपोषणकर्ते संजय आईर, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, राजेश विरनोडकर, उपतालुकप्रमुख भैय्या गोवेकर, पांडुरंग नाटेकर, उदय येडवे, नाना शिरोडकर, देवा माने, गिरिश नाटेकर, राकेश विरनोडकर, अमित धुरी यांच्यासह दशक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page