*नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळताच वेंगुर्ले भाजपातर्फे शहरांत जल्लोष

*💫वेंगुर्ले दि.०७-:* महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याने वेंगुर्ले ताालुका भाजपाच्यावतीन फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष करण्यांत आला. केंद्रीय मंत्रीमंडाळाच्या विस्ताराची चर्च सुरू झाल्यापासून दिल्लीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. विशेषत: महाराष्ट्रातtन सिंधुदुर्गचे नेते नारायण राणे यांचे नाव चर्चेत होते. केंद्रीय मंत्रीमंडळांत शपथ घेणाऱया 43 मंत्रीमंडळाच्या यादीत नारायण राणे यांचे नाव आघाडीवर होते. नारायण राणे यांना मोदी सरकारने पाfहल्या रांगेत स्थान दिले आहे. राणे आजपर्यत 6 वेळा आमदार, 1 वेळा मुख्यमंत्री, महसुलमंत्री, उद्योगमंत्री, बंदरविकासमंत्री आदी मंत्रीपदे भूषविलेली आहे. नारायण राणे यांनी मंत्री शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्रथम वेंगुर्ले तालुका भाजपातर्फे शहरातील गजबजलेला नाका असलेल्या दाभोली नाका येथील मातोश्री कला क्रिडा मंडळाच्या ठिकाणी फटाक्यांच्या माळा लावून आतषबाजी करत `नारायण राणे झिंदाबाद… नारायण राणे तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ है.’ अशा घोषणा देण्यांत आल्या. यावेळी उपस्थित भाजपाच्या पदाधिकाऱ्यात जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, तालुका चिटणीस जयंत मोंडकर, सरचिटणीस बाबली वायंगणकर, जि. प. सदस्य, विष्णूदास उर्फ दादा कुबल, तुषार साळगांवकर, जिल्हा कार्यकारीण सदस्य वसंत तांडेल, नगरसेवक प्रशांत आपटे, लक्ष्मीकांत कर्पे, समीर उर्फ भूषण सारंग, गणेश नार्वेकर, मेहबुब मकानदार, मारूती दोडानशेट्टी, भूषण आंगचेकर, यतीन आवळेगांवकर यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page