*💫कणकवली दि.०७-:* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्याच मंत्रिमंडळात खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर कणकवली शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि नागरिकांना पेढे वाटून जल्लोष केला. कणकवली पटकीदेवी येथे कणकवली शहर भाजपच्या वतीने फटाके फोडत, पेढे, लाडु एकमेकांना भरवत तोंड गोड करत आनंदोत्सव साजरा केला.तसेच भारतीय पार्टीचा विजय असो, नारायण राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. तद्नंतर पटकीदेवी ते पटवर्धन चौक अशी टूव्हीलर रॅली काढण्यात आली.तर पटवर्ध चौकात ही फटाके फोडत घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी जि.प.अध्यक्षा संजना सावंत, नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, अभिजित मुसळे, अण्णा कोदे, शिशिर परूळेकर, विराज भोसले, राजश्री धुमाळे, प्रज्ञा ढवण, नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, महिला शहरअध्यक्षा प्राची कर्पे, साक्षी वाळके, संदीप मेस्त्री, राजन परब, विठ्ठल देसाई, सुशील पारकर, बबलू सावंत, संदीप नलावडे, मंगेश तळगाकर, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम, हृतिक नलावडे, ओंकार सुतार आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या मंत्रीपदाचा फायदा नक्कीच कोकण विकासाठी होणार असून आज खऱ्या अर्थाने कोकणला न्याय मिळाला आहे. अशा भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केल्या.
नारायण राणेंनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताच कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष…
