*💫वेंगुर्ला दि.०७-:* वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जुलै रोजी गुगलमिटद्वारे ‘अँटी रॅगिग लॉ‘ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख वक्त्या दिवाणी न्यायाधीश के.के.पाटील यांनी रॅगिग विरोधी कायद्यातील तरतुदी सोप्या भाषेत विषद केल्या. पालक व विद्यार्थी यांनी अपप्रवृत्तीचा विरोध करावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील व होमिओपॅथी कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक, वकील व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड.श्रद्धा बावीस्कर यांनी केले.
अँटी रॅगिग लॉ विषयावर मार्गदर्शन…
