काम पूर्ण झाल्याशिवाय देयके देऊ नयेत-विवेक कुबल

*💫वेंगुर्ला दि.०७-:* नातूव्हाळीतून सांडपाणी वाहून नेणे व एस.टी.पी.यंत्रणा बसविणे या कामाची देयके काम पूर्ण झाल्याशिवाय देण्यात येवू नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल यांनी वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिका-यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वेंगुर्ला नगरपरिषदेतील विरोधी पक्ष काँग्रेसच्या नगरसेवकांनी मागील कटू अनुभव लक्षात घेवून या कामाची रनिग बिले काडण्यात येवू नये अशी मागणी केली आहे. तसेच नगरसेविका सुमन निकम यांच्यावतीने नगरसेवक संदेश निकम यांनीही अशाप्रकारचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देवून उपोषणाचा इशाराही दिला आहे. त्यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. त्यामुळेच मी हे तिसरे निवेदन देत आहे. या कामासंदर्भात दीड वर्षापूर्वी मी स्वतः व वाडीतील नागरिक उपोषणास बसलो होतो. त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत याच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. आता या कामास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे हे काम योग्य त्या तांत्रिक डिपार्टमेंटच्या मार्गदर्शनाखाली करावे. त्यातला टिकावूपणा, सुसाध्यता, वापर याचा अभ्यास करुन व काम पुर्ण झाल्यानंतर त्याची चाचणी घेतल्याशिवाय या कामाची देयके काढण्यात येवू नये, अशी मागणी केली आहे. मुख्याधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्याने प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांनी हे निवेदन स्विकारले. यावेळी विवेक कुबल यांच्यासोबत माजी उपनगराध्यक्ष सुरेश भोसले व लायनेसचे प्रदिप वेंगुर्लेकर उपस्थित होते.

You cannot copy content of this page