*दोडामार्ग / सुमित दळवी* माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना आज केंद्रीय मंत्रीपद देण्यात आले आहे. आज नुकत्याच झालेल्या शपथविधीनंतर त्यांच्या कडे केंद्रीय कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार देण्यातआला आहे. राणे त्यांनी शपथ घेतल्यानंतर दोडामार्ग तालुक्यात ठिकठिकाणी तसेच भाजपा कार्यालयात समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत जल्लोष व्यक्त केला आहे. नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्यामुळे कोकणाचा विकासाच्या व पर्यटनाच्या दृष्टीने मोठा फायदा होणार आहे.
*खा. राणे यांच्या शपथविधी नंतर दोडामार्ग मध्ये भाजपकडून जल्लोष*
