शाळां विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा इशारा;तालुकाध्यक्ष प्रतीक नाईक आक्रमक
*💫सावंतवाडी दि.०५ :* संपूर्ण जगावर कोरोनाच संकट आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरही मोठ्या प्रमाणात होत आहे. उद्योग-व्यवसाय सर्व ठप्प आहेत. अशावेळी काही खासगी शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था यांच्याकडून फी साठी तगादा लावला जातो आहे. फीचा तगादा लावणाऱ्या शैक्षणिक संस्था व खासगी शाळांविरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून फी साठी पालकांकडे तगादा लावल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष प्रतिक नाईक यांनी दिला आहे.
