*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भक्तगणांचा उपस्थितीत यावर्षीचा उत्सव साजरा
*💫सावंतवाडी ता.०५-:* मुंबई गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव या गावातील परमपूज्य श्री. सदगुरु मिया साब यांचा ७६ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात कोव्हीड नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला आहे. हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे ऐक्याचे प्रतिक म्हणून ओळख असलेल्या या परमपूज्य श्री सदगुरु मिया साब यांच्या समाधीस्थळावर केवळ सावंतवाडीतीलच नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून भक्तगण उपस्थित राहतात. परंतु यावर्षी देखील कोरोनाचे संकट असल्याने अतिशय साध्या पद्धतीने मोजक्या भक्तगणांचा उपस्थितीत हा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला आहे.
