डॉ.संजिव लिगवत यांना राज्यस्तरीय पुरस्कार

*💫वेंगुर्ला दि.०५-:* रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा या प्ररणेने कोविड सारख्या जागतिक महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता वैद्यकीय सेवेचा समृद्ध इतिहास घडविणा-या १० डॉक्टरांचा जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्य साधून अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर-कसबा वाळवे (महाराष्ट्र राज्य) या सामाजिक संस्थेमार्फत पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये वेंगुर्ला येथील रहिवासी व सिधुदुर्गातील प्रसिद्धी प्राध्यापक डॉ. संजिव लिगवत यांचा समावेश आहे. उर्वरित डॉक्टरांमध्ये ई.बी.गडकरी होमिओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रोझारिओ डिसोजा, गडहिग्लज जगतगुरु पंचाचार्य होमिओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजकुमार पाटील, राधानगरी तालुका पंचायत समिती आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्रकुमार शेटये, भुदरगड तालुका आरोग्य अधिकारी कोविड रुग्णाचे विधाते डॉ.मिलिद कदम, प्रसिद्ध महिला होमिओपॅथीक डॉ.सुजाता रंगराव कामिरे, हातकणंगले येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ.संदिप मोहिते यांच्यासह अन्यही डॉक्टरांचा समावेश आहे. यावेळी अनंतशांती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव, अध्यक्ष माधुरी खोत, सचिव अरुणा पाटील, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष पत्रकार सागर लोहार व उपाध्यक्ष सुभाष चौगले, प्रकाश कारंडे, रमेश पाटील, जे.के.कांबळे व संस्थेची कार्यकारिणी उपस्थित होती.

You cannot copy content of this page