*💫कणकवली दि.०२-:* खारेपाटण येथे कोरोना रुग्णाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या खारेपाटण रामेश्वरनगर येथील कोविड केअर सेंटर करिता चिंचवली गावचे सुपुत्र तथा मुबई येथील आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक, वृत्तपत्र लेखक,समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भिकाजी कांबळे (चिंचवलकर ) यांनी नुकतीच रोख १०,००० एवढी आर्थिक मदत कोविड केअर सेंटर समितीच्या पदाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत,ग्रामविकास अधिकारी जी. सी. वेंगुर्लेकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर,कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुजित कदम,स्टाफ नर्स श्रीम.ईच्छा राणे आदी उपस्थित होते. खारेपाटण बौद्धजन सेवा संघ विभाग खारेपाटण या १२ गाव संघटनेच्या मुंबई शाखेचे माजी सरचिटणीस म्हणून काम केलेल्या मिलिंद कांबळे यांनी खारेपाटण येथील कोविड केअर सेंटरसाठी अजूनही मदत करणार असल्याचे सांगितले. तर खारेपाटण सरपंच यांनी पत्रकार संतोष पाटणकर व मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कांबळे यांचे आभार व्यक्त केले.तर कांबळे यांनी कोविड सेंटर ला दिलेल्या १०,०००/- रकमेबाबत खारेपाटण ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मिलिंद कांबळे यांची खारेपाटण कोविड सेंटरला देणगी…
