*💫सावंतवाडी दि.०२ -:* सावंतवाडी तालुक्यात आज २८ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात ६ तर ग्रामीण भागात २२ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे. यामध्ये शहरात उभाबाजार २, खासकीलवाडा ३, सालईवाडा १, तर ग्रामीण भागात आंबोली २, फणसवडे ५, माडखोल १, नीगुडे ४, बांदा ३, माजगाव १, तळवडे १, सांगेली ३, सावरवाड २ असे रुग्ण सापडले असून, सद्य स्थितीत तालुक्यात ३२५ रुग्ण सक्रिय आहेत.
सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे २८ रूग्ण सापडले
